नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फलटण((जि.सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Civil Hospital ) महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे (Sampda Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणात सहभागी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची प्रशासकीय त्रुटींची तातडीने उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून या सर्वाना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावीत या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना करण्यात आली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर नमूद केलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
तसेच तत्कालीन पोलीस अधिक्षक अनिल महाडिक व उप विभागीय पोलीस अधिकारी राहु ल धस यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करुनही त्याकडे त्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, या प्रकरणात स्वतंत्र व उच्चस्तरीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष, सखोल व वेळेवर तपास होणे अत्यावश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या कोर कमिटी सदस्य भारतीताई ताजनपुरे,शिवसेना महिलाआघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील,युवती सेना पदाधिकारी योगिता गायकवाड, महिला आघाडी पदाधिकारी शोभा दोंदे, राणी गवळी, शोभा वालडे, सुवर्ण काळुंगे, शारदा सपकाळ, शोभा दिवे, जयश्री खेताडे, बेबी मोरे, सिंधू वाघ आदींच्या स्वाक्षर्या आहेत.





