Tuesday, September 22, 2026
HomeनाशिकNashik News : कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी विभागीय आयुक्तांनी घेतली पूर्वतयारी...

Nashik News : कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी विभागीय आयुक्तांनी घेतली पूर्वतयारी बैठक

नाशिक | Nashik

विभागातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे दि. २६ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येत असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आढावा बैठक होणार आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विभागस्तरावर आवश्यक पूर्वतयारी करण्यासाठी प्रभारी विभागीय आयुक्त आयुष प्रसाद यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक घेतली.

- Advertisement -

या बैठकीस विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सहसंचालक (कृषी), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागातील जिल्हानिहाय परिस्थिती, टंचाईसदृश परिस्थितीशी संबंधित उपलब्ध माहिती तसेच संबंधित विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अद्ययावत माहिती बैठकीसाठी तयार ठेवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक माहिती व अहवाल अद्यावत ठेवावा, अशा सूचना श्री. आयुष प्रसाद यांनी दिल्या.

विभागनिहाय माहितीचे संकलन, आवश्यक आकडेवारी व सद्यस्थितीची माहिती व्यवस्थितपणे द्यावी. कृषी विभागासह संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दि. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या आढावा बैठकीत विभागातील टंचाईसदृश परिस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेऊन संबंधित विभागांकडून सादर करण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कार्यवाहीबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक माहिती अद्ययावत ठेवून बैठकीसाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही बैठकीत (Meeting) देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे...