Monday, September 14, 2026
Homeक्राईमNashik News : विघ्नसंतोषींवर पोलिसांचा स्ट्राइक; औद्योगिक, उपनगर पट्ट्यात ६८ टक्के हद्दपारी

Nashik News : विघ्नसंतोषींवर पोलिसांचा स्ट्राइक; औद्योगिक, उपनगर पट्ट्यात ६८ टक्के हद्दपारी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणेशोत्सव २०२६ सुरळीत, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Police Commissionerate) शहरातील तब्बल ४०२ उपद्रवींवर २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत शहरातून हद्दपारीची कारवाई केली आहे. 

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शहराच्या जुन्या व मध्यवर्ती भागांपेक्षा (परिमंडळ-१) औद्योगिक, कामगार आणि विस्तारणाऱ्या उपनगर पट्ट्यात (परिमंडळ-२) पोलिसांनी कारवाईची सर्वाधिक कुऱ्हाड चालवली आहे. एकूण ४०२ हद्दपारींपैकी तब्बल २७५ कारवाया (६८.४१ टक्के) एकट्या परिमंडळ-२ मध्ये झाल्या आहेत.

दरम्यान, यामध्ये सातपूर (५३), उपनगर (४६) आणि अंबड (४०) या भागात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवर आळा घालण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नसून, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही आणि गस्तीद्वारे विशेष लक्ष ठेवले जात आहे.

​पोलीस ठाणेनिहाय हद्दपार

परिमंडळ – १ (उपायुक्त: मोनिका राऊत)
आडगाव – ०७
पंचवटी -२२
म्हसरूळ – १०
भद्रकाली – २४
सरकारवाडा -११
गंगापूर – २२
मुंबईनाका -३१
एकूण परिमंडळ – १- १२७

परिमंडळ – २ (उपायुक्त: किशोर काळे)

अंबड – ४०
सातपूर – ५३
इंदिरानगर – ३६
एमआयडीसी – २५
नाशिकरोड – ४२
उपनगर – ४६
देवळाली कॅम्प – ३३
एकूण परिमंडळ – २- २७५
एकूण शहर कारवाई ४०२

ताज्या बातम्या

Nashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना...

0
सातपूर | Satpur गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातील (Satpur Area) जेपी नगर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमान मंदिरावर (Hanuman Mandir) भगवा झेंडा...