Tuesday, September 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविठुरायाच्या मुर्तींची लेपन प्रक्रिया होणार; तीन दिवस विठ्ठल-रुक्मिणी मंदिर राहणार बंद

विठुरायाच्या मुर्तींची लेपन प्रक्रिया होणार; तीन दिवस विठ्ठल-रुक्मिणी मंदिर राहणार बंद

पंढरपूर | Pandharpur
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्ती संवर्धनाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणांची होत असलेली झीज भरून काढण्यासाठी रासायनिक लेपनाची संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२२ ते २४ सप्टेंबरदरम्यान संवर्धनाचे काम
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिरातील नियमित दर्शन व्यवस्थेवर परिणाम होणार असून, भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मंदिर समितीच्या माहितीनुसार, कामासाठी २२ सप्टेंबरच्या रात्रीपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

मूर्तीच्या चरणांची झीज भरून काढण्यासाठी लेपन
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचे निदर्शनास आले होते. वारकरी आणि भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय असलेल्या या प्राचीन मूर्तींचे मूळ स्वरूप आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये रासायनिक लेपनाद्वारे मूर्तीच्या झीज झालेल्या भागांचे संवर्धन केले जाणार आहे. मूर्तीला कोणतीही हानी होऊ नये आणि तिचे प्राचीन स्वरूप अबाधित राहावे, यासाठी आवश्यक तांत्रिक काळजी घेतली जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगेंनी नवा डाव टाकला, म्हणाले, एकटाच…

ASI आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया
लेपणाचा कालावधी हा भाविकांचा स्पर्श, अभिषेक आणि वातावरणावर अवलंबून असतो. पंढरपूरमध्ये यापूर्वी केलेले संरक्षणात्मक लेपन साधारण ५ ते ६ वर्षे व्यवस्थित राहिल्याचे अनुभव आहेत. त्यानंतर पुन्हा मूर्ती जिजल्यावर त्यावर नव्याने लेपन करावे लागते. पुरातत्त्व विभागाचे सांगण्यानुसार भारतामध्ये पुरातत्व विभाग ज्या मान्यताप्राप्त पद्धतीचा वापर करतो तीच पद्धत विठ्ठल मूर्तीवर देखील वापरण्यात येते. पुरातत्त्व विभाग वापरत असलेली रसायन हे देखील हर्बल म्हणजेच नैसर्गिक असून ते मान्यता प्राप्त असल्याने त्याचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे.

संवर्धनाच्या निर्णयावरून यापूर्वीही चर्चा
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाचा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. मूर्तीवर लेपन प्रक्रिया करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता आणि या प्रकरणी न्यायालयातही अर्ज करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र संबंधित अर्ज फेटाळल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाची प्रक्रिया पुढे नेण्यात आली.

पंढरीत वर्षाकाठी जवळपास अडीच ते तीन कोटी भाविक हे विठ्ठलाचे स्पर्श करून दर्शन घेत असल्याने मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. मंदिर शासनाच्या ताब्यात आल्यापासून पहिले लेपन 1988 मध्ये केले होते. त्यानंतर थोड्या थोड्या कालावधीने चार वेळेला विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर लेपण करावे लागले होते.

विठ्ठला मूर्तीच्या चरणांवर लाखो भाविक वर्षानुवर्षे मस्तक टेकवतात आणि स्पर्श करतात. तसेच अभिषेक, तापमानातील बदल आणि आर्द्रता यामुळे दगडाची झीज होते. ही झीज वाढू नये, तडे भरून निघावेत आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे, यासाठी हे लेपन केले जाते.

पंढरीच्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन का महत्त्वाचे?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसह वर्षभर देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे मूर्तीची झीज होऊ नये आणि तिचे मूळ स्वरूप दीर्घकाळ टिकून राहावे, यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणारी ही संवर्धन प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता...