Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : मनपाच्या उद्यान विभागाला जाग; विनापरवाना वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई

Nashik News : मनपाच्या उद्यान विभागाला जाग; विनापरवाना वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई

१.३४ कोटी वसूल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मनपाचे (Nashik NMC) उद्यान विभाग (Parks Department) आता चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत असून शहरपरीसरात विनापरवानगी वृक्ष तोडणाऱ्यांकडून तब्बल १.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनापरवानगी वृक्ष तोडणे गुन्हा असूनही याकडे सर्रास डोळेझाक करुन विविध ठिकाणी झाडे तोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान उद्यान विभागाने नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, पश्चिम, सातपूर व नवीन नाशिक भागात दंडात्मक कारवाई केली आहे. तर ४३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वाधिक पंचवटी विभागातून (Panchavati Section) ३५ तर नवीन नाशिक विभागामधून (New Nashik Section) ३४ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनापरवानगी वृक्षतोडीला लगाम बसावा, यासाठी शासनाने दंडाची रक्कम वाढवली आहे. मात्र असे असूनही नाशिक शहरात छुप्या पद्धतीने व रात्रीच्या वेळी झाडांची तोडणी केली जात आहे. दरम्यान शहरात पन्नास लाख वृक्षसंपदा असून यामुळेच नाशिकमधील वातावरण इतर शहरांच्या तुलनेने अधिक चांगले असते. वृक्षसंपदेचे संवर्धन व्हावे, यासाठी महापालिकेसह सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यांच्याकडून जनजागृती केली जाते. मात्र झाडे लावा, झाडे जगवा ! या संदेशाकडे काही नागरिकांकडून बिनधास्तपणे डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे.

त्यामुळेच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीबरोबच फांद्या छाटणीचे प्रकार समोर येत आहेत.यापूर्वी महापालिकेने नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा परिसरात एका मोठ्या राजकीय नेत्याच्या (Political Leader) पुत्राने अनधिकृत वृक्षाची तोड केली असता मनपाने चार लाखाचा दंड वसूल केला होता. दरम्यान महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम ८ अन्वये नागरी क्षेत्रावरील (खाजगी, शासकीय) वृक्ष तोडण्यावर प्रतिबंध घातला आहे. परंतु शहरातल्या विविध भागात काही वृक्ष धोकादायक झाल्याने त्यामुळे नागरिकांच्या जीवितांस धोका ठरु शकतो. तर काही वृक्ष ही विकास कामांमध्ये अडथळा ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात.

दरम्यान, अशा परिस्थितीत अधिनियमातील तरतुदीप्रमाणे वृक्ष (Trees) तोडणेबाबतच्या प्रस्तावांवर निर्णय होऊन आवश्यकतेप्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी भरपाई वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर वृक्ष तोडणेस मंजुरी दिली जाते. मात्र सध्या काही अवैध वृक्षतोड होत असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. त्यानुसार शहरातील नागरिक व इमारती उभ्या करणारी मंडळी हे वृक्ष तोडण्याची परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड करत आहे, किंवा वृक्षांचा विस्तार कमी करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

४३७ गुन्हे

नाशिक पूर्व विभाग११४
नाशिक पश्चिम विभाग११९
पंचवटी विभाग६०
नाशिकरोड विभाग५४
नवीन नाशिक५४
सातपूर विभाग३६

शहरात कोणेही विनापरवानगी वृक्षतोड, फांद्या छाटणे आदी प्रकार करु नये, असे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येईल.

विवेक भदाणे, अधिक्षक, उद्यान विभाग, मनपा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...