Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : मनमाड-इगतपुरी मार्गाच्या कामाला गती येणार

Nashik News : मनमाड-इगतपुरी मार्गाच्या कामाला गती येणार

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनमाड ते इगतपुरी (Manmad to Igatpuri) तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनच्या प्रस्तावित कामात येत असलेल्या अडथळ्यांवर रेल्वे विभागाने सादरीकरण केल्यानंतर त्या कामाला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (दि.३) बैठक घेतली. या बैठकीत मनमाड ते इगतपुरी तिसऱ्या व चौथ्या रेल्वेलाईनच्या प्रस्तावित कामाबाबत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सादरीकरण करण्यात आले.

- Advertisement -

त्यात प्रामुख्याने लहवित, लासलगाव, निफाड येथे रेल्वेलाईनच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती सादर करण्यात आली.बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) मनमाड ते इगतपुरी रेल्वेलाईनच्या कामाची गती समजून घेतली व या कामात येणाऱ्या अडचणी मार्गी लागण्याबाबत अधिकाऱ्यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी विशाल भावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर सिंह, एक्सइन-सी मनमाड जयहरदीप सिंह तसेच नाशिक प्रांत अर्पिता चव्हाण, समन्वय अधिकारी स्वाती थविल, चांदवड प्रांत कैलास कडलग, मुख्य अधिकारी दिनेश सिनारे, सार्वजनिक बांधकामचे उदय पालवे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मध्य रेल्वेकडून (Central Railway) मनमाड ते इगतपुरी या मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन टाकण्याचे काम गतिमान करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम सुरू आहे. मात्र रेल्वे लाईनच्या कामात लहवित (एलसी-८४- १), निफाड (एलसी-९९ए), लासलगाव (एलसी-१०५) या ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत सादरीकरण करण्यात आले.या अडचणीवर मार्ग काढून कामातील अडथळे दूर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

मनमाड-इगतपुरीच्या तिसन्या आणि चौथ्या रेल्वे लाइनचा प्रश्न मार्गी लागल्यास यामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मनमाड ते इगतपुरी रेल्वे लाइन कामाला गती मिळत असली तरी इगतपुरी ते कस्वरांपर्यंत नेण्याची मागणी अनेक वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईचा प्रवास सुकर होणार आहे. मात्र त्याबाबत मध्य रेल्वेकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या दिसून येत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...