Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik News : सुरक्षा कमान अपघातांना कारणीभूत; द्वारका 'ग्रेड सेपरेटर'चे काम सुरू

Nashik News : सुरक्षा कमान अपघातांना कारणीभूत; द्वारका ‘ग्रेड सेपरेटर’चे काम सुरू

गर्डर, बॅरिकेडस्वर धडकून किरकोळ अपघात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

द्वारका चौकात (Dwarka Chowk) सुरू असलेल्या ‘ग्रेड सेपरेटर’च्या कामामुळे वाहतूक सुरळीत राहावी, अवजड वाहनांना प्रवेश नसावा यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून बसवण्यात आलेल्या ‘हेवी गर्डर’ कमानीच आता धोक्याच्या ठरत आहेत. स्पष्ट सूचना, पर्यायी मार्गाचे प्रभावी नियोजन आणि कडक अंमलबजावणीअभावी गेल्या चार दिवसांत या कमानीला धडकून दोन अपघात घडले असून शहरातील वाहतूक (Trafic) व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

- Advertisement -

ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे सारडा सर्कल, ट्रॅक्टर हाऊस व लगतच्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कंत्राटदाराने ठराविक उंचीच्या गर्डर अर्थात लोखंडी कमान उभारल्या आहेत. कंटेनर, बसेस, टूकसारख्या अवजड बाहनांना या मागनि प्रवेश मिळू नये म्हणूण बसवलेल्या या गर्डरला भेट्न काही बेशिस्त वाहनचालक मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या चार दिवसांत दोनवेळा भरधाव कंटेनरने या कमानींना धडक दिली. या धडकेत कमानीसह वाहनांचे नुकसान झाले असून काहीकाळ वाहतूक ठप्प झाली.

सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याचे यंत्रणेने सांगितले असून, बुधवारी (दि.४) कमानीला सारडा सर्कल परिसरात अवजड वाहनाने धडक दिल्यानंतर तिचे नुकसान झाले. दुपारनंतर ती पुन्हा उभारण्यात आली. या मागनि नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पुढे कमान असल्याचे कळत नाही. दिशादर्शक फलक, उंचीची स्पष्ट माहिती, रात्रीसाठी पुरेसे रिफ्लेक्टर वा प्रकाश योजना अपुरी असल्याने हे अपघात घडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. आडगाव नाका, ट्रॅक्टर हाऊस, डीजीपीनगर, अशोका मार्ग आदी ठिकाणांहून अवजड वाहनांना रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना तातडीने गरजेच्या असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.

रिक्षाचालकांचा अडसर

द्वारका परिसरातील काठे गल्ली सिग्नलपर्यंत खोदकाम सुरू असल्याने मोठ्या वाहनांना इतर मागाँनी वळवण्यात आले आहे. यासाठी वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले असून प्रमुख मार्गावर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तरीही बेरिकेडस्ला धडकून अपघात घडत आहेत. अरुंद रस्त्यांवर रिक्षाचालक व फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे कोंडी वाढत असून त्याचा फटका नाशिककरांना बसत आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...