Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik News : वर्षभरात अडीच हजार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

Nashik News : वर्षभरात अडीच हजार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

आठ कोटींचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यातील अवैध मद्यविक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) वतीने नियमित कारवाई होत असते. मात्र, अनेकदा कारवाईपूर्वीच संशयित अवैध मद्यसाठा सोडून पसार झाल्याच्याही नोंदी आहेत. पण जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल अडीच हजार गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांमध्ये १५० वाहने जप्त करून अडीच हजारांपेक्षा जास्त संशयितांना एबीसीडीसह अन्य विभागीय पथकांनी अटक (Arrested) केली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये अवैध मद्यसाठ्यासह जप्त केलेल्या वाहनांनुसार आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल वर्षभरात हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध मद्यसाठाच्या गुन्ह्यांची नोंद होऊनही तपास रखडण्याचे प्रमाण वाढत असते. परंतु सन २०२४ मध्ये २,५९० गुन्ह्यांपैकी केवळ एका गुन्ह्यात संशयित सापडले नसल्याने उर्वरित सर्व गुन्ह्यांचा (Crime) तपास सुरू आहे. दरम्यान, सन २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ झाली. तर नववर्ष स्वागतापूर्वर्वीदेखील अवैधरीत्या विक्री होणाऱ्या मद्यसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाने नजर ठेवली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात ग्रामीण पोलीस दलाच्या (Rural Police Force) भरारी पथकांनी विविध ठिकाणी छापे मारून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यासह अवैधरीत्या केलेला लाखो रुपयांचा मद्यसाठादेखील जप्त करण्यात आला.

इतकेच नव्हे तर शहरातदेखील या स्वरुपाच्या कारवायांनी वेग धरला होता. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त झाला आहे. परिणामी, अवैध दारुविक्रीला चाप लावण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्कसह पोलिसांसमोर कायम आहे. सर्वात जास्त कारवाया A फ्लाईंग स्कॉड एक अणि दोनने केल्या असून त्यापाठोपाठ मालेगाव आणि कळवण विभागाने केल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक कमी कारवाया करण्याचे श्रेय बोरगाव पथकाने (Squad) मिळवले आहे.

जानेवारी ते २६ डिसेंबर २०२४

१) कारवाई -२,५९०
२) संशयित -२,६०७
३) जप्त वाहने १५७
४) दंड ७ कोटी ८३ लाख १० हजार ३५७ रुपये

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...