Saturday, June 20, 2026
HomeनाशिकNashik News : ग्रामीण भागात 'ओव्हेरियन फार्मिंग'; अमोल पाटीलने महिलांना बनवले 'एग...

Nashik News : ग्रामीण भागात ‘ओव्हेरियन फार्मिंग’; अमोल पाटीलने महिलांना बनवले ‘एग फॅक्टरी’

उत्तर महाराष्ट्रातील शेकडो महिलांशी खेळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बदलापूर (Badlapur) येथील स्त्री-बीज विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल पाटील याच्या अटकेनंतर आता ‘नाशिक कनेक्शन’चा एक भयावह चेहरा समोर आला आहे, ज्याने वैद्यकीय क्षेत्र सुन्न झाले आहे. केवळ दलाली नाही, तर अमोल पाटीलने (Amol Patil) स्वतःच्या दंत वैद्यकीय ज्ञानासह, पत्नीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ पदवीचा गैरफायदा घेत नाशिकच्या ग्रामीण भागात ‘हॉर्मोनल फार्मिंग’ चा धंदा चालविल्याचा संशय बळावला आहे.

- Advertisement -

अमोल पाटील हा उच्चशिक्षित असल्याने त्याला आयव्हीएफ (IVF) क्षेत्रातील कायदेशीर पळवाटांची पूर्ण माहिती होती. नाशिक, उत्तर महाराष्ट्र व बदलापूरमध्ये त्याने अशा महिलांची निवड केली ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. निसर्गतः स्त्रीच्या शरीरात महिन्यातून एकच बीज तयार होते. मात्र, अमोल पाटीलने अधिक नफ्यासाठी पीडित महिलांना ‘ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन ‘ची घातक इंजेक्शन्स देऊन एकाच वेळी १० ते १५ बीजे तयार करण्यास भाग पाडले.

नाशिकच्या (Nashik) निमशहरी आणि आदिवासी पट्ट्यातील महिलांना ‘शक्तीचे इंजेक्शन’ सांगून त्यांच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ खेळल्याचे प्राथमिक तपासात समोर येते आहे. या रॅकेटमध्ये नाशिकमधील काही लहान नर्सिंग होम्स आणि पॅथॉलॉजी लॅब्स ‘लॉजिस्टिक्स’ पुरवत होत्या का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अटकेच्या वेळी पाटीलकडे सापडलेली संशयास्पद कागदपत्रे नाशिकमधील काही बड्या नावांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. ज्या महिलांच्या शरीरातून ही बीजे ‘ओढून’ काढली गेली, त्यांना भविष्यात किडनी निकामी होणे किंवा कायमचे वंध्यत्व येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

काय आहे एआरटी कायदा ?

  • ‘आसिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी अॅक्ट २०२१’ नुसार स्त्री-बीजांची खरेदी-विक्री हा अजामीनपात्र गुन्हा
  • कलम ३३: मानवी स्त्री-बीज किंवा शुक्राणूंची विक्री करणे पूर्णतः बेकायदेशीर
  • कलम २४: दात्याची लेखी संमती आणि धोक्यांची पूर्ण जाणीव करून देणे अनिवार्य
  • मर्यादाः दात्याचे वय २१ ते ३५ दरम्यान असावे आणि ती महिला आयुष्यात केवळ एकदाच बीज दान करू शकते.
  • गुन्हेगाराला प्रथम गुन्हा केल्यासः ५ ते १० वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १० ते २० लाख रुपये दंड.
  • पुन्हा गुन्हा केल्यास (किंवा रॅकेट असल्यास): ८ ते १२ वर्षांपर्यंत कैद आणि २० ते ५० लाख रुपये दंड

धक्कादायक

  • पोर्टेबल फ्रीझिंग युनिट्स : चोरलेली स्त्री-बीजे जिवंत ठेवण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. पाटीलने नाशिकमध्ये छुप्या पद्धतीने ही युनिट्स वापरल्याचा संशय आहे.
  • बनावट संमतीपत्रे : पीडित महिलांना ‘गर्भपाताचे फॉर्म’ असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यांच्याकडून स्त्री-बीज दानाची कायदेशीर संमती घेतल्याचे भासवले.
  • पत्नीच्या लेटरहेडचा वापर : पाटीलने पत्नीच्या क्लिनिकच्या लेटरहेडचा वापर करून या अवैध व्यवहारांना ‘अधिकृत’ स्वरूप देण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात;...

0
मुंबई | Mumbai गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री...