Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा; मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन...

Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा; मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

नाशिक | Nashik

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १ सप्टेंबर) रोजी नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान, एमजी रोड, जिल्हाधिकारी कार्यालय ते आदिवासी विकास आयुक्तालय या मार्गे आदिवासी विद्यार्थ्यांनी ‘उलगुलान’ मोर्चा काढला. या भव्य मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाजबांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

गेल्या १५ दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमधील मुले आणि आदिवासी समाजातील विविध प्रतिनिधी आपल्या रास्त मागण्यांसाठी एकत्र आले आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून या आंदोलनाला तीव्र पाठिंबा मिळत असून आजच्या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, वसतिगृह आणि आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांचा या मोर्चातील सहभाग विशेष लक्षवेधी ठरला असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे नाही

मोर्चादरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त करताना सरकारला स्पष्ट इशारा दिला. “जोपर्यंत शासन आमच्या सर्व रास्त आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा मोर्चा आणि आमचे उग्र उलगुलान आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

राहुल गांधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँगेस खासदार राहुल गांधी हे उद्या (बुधवारी) नाशिक दौऱ्यावर असून, ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमधील सुविधा आणि पोषण आहाराबाबत काढलेल्या वादाग्रस्त शासन निर्णयाविरोधात (GR) राज्यभरातील आदिवासी युवक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...