Monday, September 28, 2026
Homeक्राईमNashik News : घरात आनंदाचे क्षण नांदणार, पाळण्यातून हसण्याचे सूर उमटणार, मात्र...

Nashik News : घरात आनंदाचे क्षण नांदणार, पाळण्यातून हसण्याचे सूर उमटणार, मात्र नियतीने…; बारा दिवसांच्या चिमुकल्याचा झोपेतच अंत, नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरात आनंदाचे क्षण नांदणार, पाळण्यातून हसण्याचे सूर उमटणार आणि बारसे (नामकरण) सोहळ्याने चिमुकल्याचे नाव जगासमोर येणार, मात्र नियतीने या साऱ्या अपेक्षांवर क्षणार्धात पाणी फेरले. अवघ्या बारा दिवसांच्या बाळाला मृत्यूने झोपेतच कवटाळल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमधील सातपूर परिसरात (Satpur Area) घडली. विशेष म्हणजे, शवविच्छेदन अहवालात बाळाचा मृत्यू न्युमोनियाने झाल्याचे स्पष्ट झाले असून, तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

सातपूर हद्दीतील पाईपलाईन रोडवरील गणेशनगरात राहणाऱ्या मिरा जितेंद्र कानडे यांचे बारा दिवसांचा नवजात शिशु बुधवारी (दि. २५) सायंकाळी साडेसात वाजता झोपलेले होते. दुसरीकडे त्याचे बारसे साजरे करण्यासाठी कुटुंबाची लगबग सुरु होती. मात्र, साडेसात वाजता त्याच्या आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळ कोणतीही हालचाल करत नसल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. क्षणातच आनंदाचे वातावरण चिंतेत बदलले. पालकांनी तातडीने बाळाला रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

मात्र रात्री साडेदहा वाजता तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानुसार, बाळाला न्युमोनिया (Pneumonia) झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. प्राथमिक तपासात बाह्य जखमा अथवा संशयास्पद बाबी आढळून आलेल्या नाहीत. हवालदार गणेश घारे पुढील तपास करत आहेत.

नियतीने साधला डाव…

ज्या दिवशी घरात नाव ठेवण्याचा सोहळा, पाहुण्यांची वर्दळ आणि मंगल वातावरण असायला हवे होते, त्याच दिवशी शोककळा पसरली. आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, नातेवाइकांच्या शब्दांत वेदना आणि परिसरात हळहळ असे दुःख पाहायला मिळाले. क्षणभंगुर आयुष्याचे हे विदारक वास्तव घटनेतून अधोरेखित झाले असून, आनंदाच्या उंबरठ्यावर अचानक ओढवलेली शोकांतिका सर्वांनाच अंतर्मुख करणारी आहे.

ताज्या बातम्या

सुप्रीम

UPI पेमेंट शुल्कावर सुप्रीम कोर्टाची मोठी दखल; केंद्र-RBIला नोटीस, चार आठवड्यांत...

0
नवी दिल्ली | New Delhiयूपीआयच्या निवडक व्यापारी व्यवहारांवर (P2M) मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे....