Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : रासेगावातील 'या' कंपनीत आग; दोन कामगार जखमी

Nashik Dindori News : रासेगावातील ‘या’ कंपनीत आग; दोन कामगार जखमी

दिंडोरी | वार्ताहर | Dindori

नाशिक-पेठ महामार्गावरील दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) रासेगाव (Rasegaon) येथे असलेल्या ‘स्पेक्ट्रम इथर्स’ या रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (मंगळवारी) सकाळी ११ च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर कंपनीत गॅस गळती झाल्याची अफवा पसरल्यामुळे कामगारांची मोठी पळापळ झाली. या घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

- Advertisement -

धुराचे लोट आणि घबराट

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना कंपनीत अचानक आग लागली. आगीचे स्वरूप सुरुवातीला किरकोळ होते, मात्र कंपनीतून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडू लागल्याने आणि आत गॅस गळती झाल्याची चर्चा पसरल्याने परिसरात कमालीची घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी कामगारांनी बाहेर पडण्यासाठी एकच पळापळ केली, ज्यामध्ये काही कामगार किरकोळ जखमी झाले.

घटनास्थळी मदतकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे (Dindori Police Station) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच अग्निशमन दलाच्या गाड्यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

स्थिती नियंत्रणात

पोलिसांकडून (Police) परिसरातील नागरिकांना आणि कामगारांना शांततेचे आवाहन करण्यात आले असून, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...