Monday, November 16, 2026
HomeनाशिकNashik News : मुंबईसारख्या महानगरांमध्ये 'आदिवासी एम्पोरिअम' उभारा; आढावा बैठकीत विवेक...

Nashik News : मुंबईसारख्या महानगरांमध्ये ‘आदिवासी एम्पोरिअम’ उभारा; आढावा बैठकीत विवेक पंडित यांचे प्रशासनाला निर्देश

शबरी महामंडळाच्या कामकाजाचा समावेश व्हिजन डॉक्युमेंट २०४७ मध्ये करण्याच्याही सूचना

नाशिक | Nashik

आदिवासी बांधवांची (Tribal ) समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये भव्य ‘आदिवासी एम्पोरिअम’ उभारण्यात यावे, तसेच आदिवासी बांधवांच्या उपजीविका वृद्धीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ करत असलेल्या कामकाजाचा समावेश शासनाच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट २०४७’ मध्ये करण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित (Vivek Pandit) यांनी दिल्या.

- Advertisement -

नाशिक (Nashik) येथील आदिवासी विकास भवनात, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या परिषद सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भा.प्र.से.), अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे (भा.प्र.से.), उपायुक्त विनिता सोनवणे, शशिकला अहिरराव, संतोष ठुबे, सहसंचालक (लेखा) कपिल पवार, महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ यांच्यासह आयुक्तालय व महामंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष विवेक पंडित म्हणाले, “काळानुरूप आदिवासी बांधवांची लोप पावत चाललेली मूळ संस्कृती, कला आणि जीवनपद्धती जगासमोर आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शासन सर्व स्तरांवर कटिबद्ध आहे. महामंडळ आणि आयुक्तालयाच्या समन्वयातून ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून सुरू असलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. वारली, गोंडी आणि चित्रकथी यांसारख्या पारंपरिक चित्रकला, वैशिष्ट्यपूर्ण तारपा वाद्य, पारंपरिक नृत्ये आणि आरोग्यदायी आदिवासी खाद्यसंस्कृती या सर्वांवर सध्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने शासनाचा एक अत्यंत विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाचा ब्रँड विकसित केला आहे.

महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध जीवनमान विकास योजनांचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले, “आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक संस्था (FPO), गरजू घटकांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या सुलभ कर्ज योजना आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एकलव्य कुशल’ आधारित कौशल्य विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर आदिवासी तरुणांना व महिलांना शाश्वत रोजगार मिळून, त्यांच्या उत्पादनांना ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

बैठकीच्या सुरुवातीला आदिवासी विकास आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भाप्रसे) यांनी एका सर्वसमावेशक सादरीकरणाद्वारे महामंडळाच्या विविध योजनांची सद्यस्थिती व प्रगती अहवाल मांडला. यामध्ये ‘शबरी नॅचरल्स’ची मूळ संकल्पना, कार्यपद्धती, क्षेत्रीय कार्यालयांची भूमिका, आदिवासी शेतकरी उत्पादक संस्थांचे जाळे आणि ‘आदिशबरी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक व आर्थिक उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी समितीसमोर मांडली.

शबरीची बोरं आता निसर्गाला धरून मॉडर्न झाली!

शबरी नॅचरल्सच्या (Shabari Naturals) विविध उत्पादनांची आकर्षक मांडणी, दर्जा, लेबलिंग आणि आधुनिक पॅकेजिंग पाहून विवेक पंडित यांनी विशेष आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. “उत्पादनांचे पॅकेजिंग आणि डिझाइन पाहिल्यावर शबरीची बोरं आता निसर्गाला बघून मॉडर्न झाली असल्याचे दिसून येते. आपल्या उत्पादनांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे व्यावसायिक यश तर मिळत आहेच, पण त्यासोबतच खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे जतनही होत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...