येवला | प्रतिनिधी | Yeola
वाढत्या उन्हा बरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात (Rural Area) पाणीटंचाईची तीव्रताही वाढते आहे. १९ टँकरद्वारे ३२ खेपांच्या माध्यमातून तालुक्यातील २३ गाव ८ वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्रते बरोबर झपाट्याने जलस्रोत घटत आहे. विहिरी, कूपनलिका कधीच कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांची (Citizen) विशेषतः महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माणसां बरोबरच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर पूर्व भागात टंचाईची (Scarcity) दाहकता अधिक आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट
तालुक्यातील आहेरवाडी, ममदापुर, खरवंडी, कोळगाव, कोळगाव, कोळम बु., कोळम खु, देवदरी, चांदगांव, गोराणे वस्ती, आदिवासी वस्ती, जाधव वस्ती, साळवे वस्ती, संभाजीनगर, पांजरवाडी, भुलेगाव, आडसुरेगांव, देवठाण, गोरखनगर, भगतवस्ती, वाघ वस्ती, चव्हाण वस्ती, वसंतनगर, बोराडे वस्ती, कोळस टेकडी, गोरे वस्ती, हडप सावरगांव, खामगाव, पन्हाळसाठे, पिंपळखुटे तिसरे, पिंपळखुटे बुद्रुक, राजापूर, धामणगाव या गाव आणि वाड्या वस्त्यांना सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
हे देखील वाचा : Nashik ZP News : जिल्हा परिषदेत सहा कोटींचा सोलर घोटाळा? टेंडरविनाच ठेकेदाराला काम
तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा (Water Supply) योजनेवर इतर गावे जोडल्याने या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झाला. त्यामुळे या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांव व इतर १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्यात आला आहे. सदर योजनेचे काम सुमारे सत्तर टक्के पूर्ण झाले असून निधी अभावी उर्वरित काम रखडले आहे. राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचेही काम अंतिम टप्प्यात असून रस्ता, पेट्रोलियम कंपन्यांच्या पाईप लाईन क्रॉसिंगच्या काही परवानगी बाकी आहेत.
पालखेड डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन
येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा वितरीका क्रमांक २८ ते ५२ला नुकतेच पाणी आवर्तन देण्यात आले. तसेच बोकटे येथील यात्रेसाठी देखील पाणी देण्यात आल्याने या लाभक्षेत्रातील अनेक गावांचा पाणी प्रश्न तूर्त मिटला आहे. या बरोबरच ३८ गाव पाणी योजना व शहराला पाणी पुरवठा करणारा साठवण तलावही पाट पाण्याच्या आवर्तनाने भरला गेला असल्याने योजनेतील गावांसह शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक





