Friday, July 3, 2026
Homeनाशिकनाशिक महापालिकेच्या माजी नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू

नाशिक महापालिकेच्या माजी नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू

जुने नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाचा कहर वाढत आहे. रोज विविध भागातून नवीन रुग्ण मिळत आहे दरम्यान आज एका माजी नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू झाले.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते कर्करोगाने देखील त्रस्त होते. त्यांच्या  निधनाची वार्ता पसरताच जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या माजी नगरसेवकांचे दोन मुले देखील सध्या उपचार घेत असल्याचे समजते. सुमारे एक वर्षापूर्वी त्यांना कर्करोग झाला होता.

दोन आठवड्यांपूर्वी करोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती.  ते राहत असलेल्या संपूर्ण परिसराला विशेष फवारणी करून सील करण्यात देखील आले होते. दरम्यान, आज दुपारी त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...