Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik NMC Ward Reservation : महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत सुरू; कुठे-काय आरक्षण?

Nashik NMC Ward Reservation : महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत सुरू; कुठे-काय आरक्षण?

नाशिक | Nashik

आगामी महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) आज (मंगळवार) प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे काढली जात आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित आहेत.

- Advertisement -

पारदर्शक ड्रममधून लहान मुलांच्या (Children) हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण (Reservation) निश्चित केले जात आहे. या आरक्षण सोडतीमध्ये ३१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक चारमधील (ब) आणि ११ मधील (ब) हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे.

तसेच प्रभाग क्रमांक ६ (अ) प्रभाग क्रमांक चार (ब) प्रभाग क्रमांक २३ (अ ) अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. अनुसूचित जमाती महिलांसाठी नऊ पैकी पाच जागा आरक्षित राहणार आहेत. याशिवाय अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक १, २, ४,८,९,१९,२१, २२ आणि २७ आरक्षित झाले आहेत.

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...