Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NMC News : महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला; ३३ ओबीसी...

Nashik NMC News : महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला; ३३ ओबीसी तर ६१ जागा महिलांसाठी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण (Reservation) निर्धारण व सोडत कार्यक्रमाची घोषणा केली असून, मनपाची (NMC) आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ३३ जागांवर ओबीसी तर ६१ जागा महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहे. महिलांच्या जागा चिठ्ठी पध्दतीने निघणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

- Advertisement -

आरक्षण ठरविताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवगीय प्रवर्गासाठी फिरते आरक्षण लागू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आरक्षण जाहीर करुन नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत, त्यावर विचार करून अंतिम आरक्षण निश्चित केले जाईल. त्यानंतर शासन राजपत्रात अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. आयोगाचे आदेश सोमवारी (दि. २७) नाशिक महापालिकेला (Nashik NMC) प्राप्त झाले असून, त्यानुसार प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया निश्चित वेळापत्रकात पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने आयोगाने आरक्षण निर्धारण व सोडतीसाठी सात टप्यांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना (बृहन्मुंबई संख्या निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता देणे सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे, हरकती मागविणे आणि अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मनपाला प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त

२०१७ ची आरक्षण स्थिती

  • एकूण जागा – १२२-
  • सर्वसाधारण – ६२
  • ओबीसी – ३३
  • अनुसूचित जाती – १८
  • अनुसूचित जमाती – ९
  • महिला आरक्षण – ६१

आरक्षण सोडत कार्यक्रम

  • आरक्षित जागांचा प्रस्ताव सादर करणे : ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
  • आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे : ८ नोव्हेंबर
  • आरक्षण सोडत काढणे : ११ नोव्हेंबर
  • प्रारूप आरक्षण जाहीर करणे व हरकती मागविणे : १७ नोव्हेंबर
  • हरकती सादर करण्याची अंतिम मुदत : २४ नोव्हेंबर
  • हरकतींचा विचार व निर्णय : २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
  • अंतिम आरक्षण अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करणे : २ डिसेंबर

ताज्या बातम्या

महिलांची अंतर्वस्त्र चोरणार्‍या विकृताला दिला चोप

0
पिंपळगाव बसवंत | वार्ताहर Pimpalgaon Basvant पिंपळगाव बसवंत येथे महिलांची अंतर्वस्त्र चोरणार्‍या विकृताला नागरिकांनी पकडून चोप देण्याची घटना घडली आहे. एका नगरात रोज महिलांच्या अंतर्वस्त्र चोरीच्या...