Sunday, May 5, 2024
Homeनाशिकपेट्रोलने ८०चा टप्पा ओलांडला तर डिझेल ६९ रुपये प्रतिलिटर

पेट्रोलने ८०चा टप्पा ओलांडला तर डिझेल ६९ रुपये प्रतिलिटर

नाशिक : निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून पेट्रोल प्रतिलिटर ऐंशीपार गेले आहे तर डिझेलही प्रतिलिटर सत्तरीच्या घरात पोहोचले आहे. गुरुवारी (दि.12) पेट्रोल 81.17 रुपये तर डिझेल 68. 76 रुपये इतका दर होता.

तेलाचे प्रमुख उत्पादक असलेल्या अरब राष्ट्रात अस्थिरतेची परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. त्याचे परिणाम भारतावरदेखील झाले आहेत. पंधरा दिवसात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत डिझेल दरात किरकोळ दरात साधारणत: दीड रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर खाली उतरत नाही तोपर्यंत इंधनाचे दर पुढील काळात वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

कंपन्यांच्या हाती दरवाढ
‘युपीए’ सरकारच्या काळात इंधन दरवाढीवर सरकारचे नियंत्रण होते. दरवाढीची सर्वसामान्यांना झळ बसू नये, यासाठी सरकार इंधन कंपन्यांना सबसीडी द्यायची. मात्र, 2014 मध्ये केंद्रात ‘एनडीए’ सरकार सत्तेत आल्यावर इंधनाचे दर नियंत्रण मुक्त केले. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरानुसार दररोज इंधनाचे दर बदलत असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईल दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे नियंत्रणमुक्त आहे. बाजारपेठेतील चढ- उतारानुसार पेट्रोल व डिझेलचे दरात बदल होत आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार आहे.
-भूषण भोसले, जिल्हाध्यक्ष पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन, नाशिक

इंंधन दरवाढीचा आलेख
(लिटर/ रुपये)
तारीख                  पेट्रोल        डिझेल
1 नोव्हेंबर             78.88     68.29
10 नोव्हेंबर           79.07     68.46
17 नोव्हेंबर           80.09     68.46
30 नोव्हेंबर           81.04     68.45
9 डिसेंबर              81.21     68.76

- Advertisment -

ताज्या बातम्या