Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik News : आयुक्तालयात बदल्यांचे वारे; महत्त्वाच्या ठाण्यांच्या 'प्रभारी' पदासाठी 'लॉबिंग'

Nashik News : आयुक्तालयात बदल्यांचे वारे; महत्त्वाच्या ठाण्यांच्या ‘प्रभारी’ पदासाठी ‘लॉबिंग’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलीस आयुक्तालयातील (Nashik Police Commissionerate) काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या ‘प्रभारी’ पदांवर वर्णी लावून घेण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांत मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः गंगापूर आणि मुंबई नाका (Gangapur and Mumbai Naka) यांसारख्या मोक्याच्या पोलीस ठाण्यांसाठी अनेक निरीक्षकांनी आतापासूनच ‘लॉबिंग’ सुरू केल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल

गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड हे मंगळवारी (दि. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नियुक्ती मिळवण्यासाठी तीन पोलीस निरीक्षक विशेष प्रयत्न करत आहेत. यामध्ये सध्या ‘साइड ब्रांच’ला कार्यरत असलेल्या दोन निरीक्षकांसह एका पोलीस ठाण्यातील निरीक्षकाचा समावेश आहे. या तिघांनीही यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे. मात्र, सध्या ते प्रभारी पदावर नसल्याने गंगापूरची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे (Mumbai Naka Police Station) वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील हे देखील पुढील महिन्यात निवृत्त होत असल्याने तेथेही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सेवानिवृत्तीच नव्हे, तर आगामी काळात होणाऱ्या पदोन्नतीमुळेही अनेक जागा रिक्त होण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड (सरकारवाडा), रामदास शेळके (आर्थिक गुन्हे शाखा), रियाज शेख (वाहतूक शाखा), सोहन माच्छरे, सुरेखा पाटील आणि सुशील जुमडे यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा काही निरीक्षकांची शहराबाहेर बदली होऊ शकते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

सिंहस्थाचे समीकरण

राज्यात सध्या भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा आहे. नाशिकमधील काही उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या बदल्याही अपेक्षित आहेत. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची व्याप्ती पाहता, अनुभवी अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार की नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार, याबाबत आयुक्तालयात उत्सुकता आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले; तरुणासह दोन डिलिव्हरी बॉय जखमी


ताज्या बातम्या

आडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने नाशिक महापालिकेला मोठा धक्का दिला आहे. जमीनमालकाला मंजूर झालेला सुमारे १८ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला अदा...