Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Police News : खात्यांतर्गत मक्तेदारी मोडित; बारा पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

Nashik Police News : खात्यांतर्गत मक्तेदारी मोडित; बारा पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) सव्वानऊ महिन्यांत झालेले ४३ खून आणि वाढत्या गुन्हेगारीवरून (Criminal) राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह (CM) पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.३) अचानक बारा (प्रभारी) पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. स्ट्रीट क्राईमसह एकूणच गुन्हेगारी नियंत्रणासाठी संबंधित ‘प्रभारी’ वरिष्ठ निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आल्याचे समजत असून विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पाेलीस खात्यात एकाच ठिकाणी ‘ठाण’ मांडून बसलेल्या अनेकांची मक्तेदारी या माध्यमातून माेडित निघाल्याची चर्चा आता सुरु आहे.

- Advertisement -

पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शुक्रवारी (दि. ३) दुपारी अचानक वरिष्ठ निरीक्षकांच्या जबाबदारीत तात्पुरत्या स्वरुपात बदल केल्याचे आदेश काढले. त्यानुसार अंबडचे निरीक्षक कड यांची गंगापूर तर गंगापूरचे निरीक्षक राजपूत यांची अंबडमध्ये नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, भद्रकाली पोलिस ठाण्याचे राकेश चौधरी, पंचवटीचे गजेंद्र पाटील, म्हसरूळचे अंकुश चिंतामण, सरकारवाड्याचे सुरेश आव्हाड, नाशिकरोडचे जितेंद्र सपकाळे, उपनगरचे जयंत शिरसाठ व देवळाली कॅम्पचे श्रीनिवास देशमुख या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या सध्याच्या नेमणुकीत बदल करण्यात आले नसून ते सध्या ‘सेफझाेन’ मध्ये असल्याचे कळते.

तसेच काही दिवसांपूर्वीच अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्याकडील गुन्हे शाखा युनिट एकचा अतिरिक्त कार्यभार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कड यांची सेवानिवृत्ती लवकरच होणार असल्याचे कारण तेव्हा पुढे चर्चिचे गेले. आता एकूणच बारा प्रभारींची एकाच लाॅटमध्ये खांदेपालट करण्यात आल्याने आयुक्तालयातील फेरबदलांसाठी खात्यांतर्गत ‘कोम्बिंग’ राबविल्याची चर्चा सुरु आहे.

नवे प्रभारी असे

पोलीस अधिकारी – सध्या नियुक्ती – नवीन नेमणूक

१) मधुकर कड : अंबड गंगापूर

२) जग्वेंद्रसिंग राजपूत : गंगापूर- अंबड

३) मनोहर कारंडे : अंबड (दुय्यम) – इंदिरानगर

४) प्रकाश अहिरे : भद्रकाली (दुय्यम) – सातपूर

५) उमेश पाटील : सायबर आडगाव

६) संतोष नरुटे : मुंबई नाका – चुंचाळे

७) रणजित नलवडे : सातपूर विशेष शाखा

८) संजय पिसे : आडगाव सायबर

९) विश्वास पाटील : चुंचाळे – मुंबई नाका

१०) तृप्ती सोनवणे : इंदिरानगर वाहतूक युनिट १

११) तुषार अढावू : वाहतूक युनिट १ – वाहतूक युनिट सातपूर

१२) रियाज शेख : वाहतूक युनिट सातपूर – वाहतूक युनिट, द्वारका

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...