Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : विरोधकांना कुठला विकास हवाय? मंत्री छगन भुजबळ यांची घणाघाती...

Nashik Political : विरोधकांना कुठला विकास हवाय? मंत्री छगन भुजबळ यांची घणाघाती टीका

येवला | प्रतिनिधी | Yeola

येवला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. ज्या लोकांनी मला विकासासाठी येथे आणले त्यांना मात्र विकास दिसत नाही. त्यांना नेमका कुठला विकास हवाय? त्यांनी मला सांगावे किंवा शोधून काढावा, अशी घणाघाती टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधकांवर केली.

- Advertisement -

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे (Yeola-Lasalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षातील उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज भारम येथे भव्य सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रचारप्रमुख अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते त्यात्यासाहेब लहरे, अरुण थोरात, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी सभापती किसनकाका धनगे, किशोर सोनवणे, राजेंद्र परदेशी, नाना लहरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राजाभाऊ लोणारी, संजय पगारे, विनायक भोरकडे, मच्छिंद्र थोरात, बाळासाहेब पिंपरकर, भागीनाथ पगारे, गोरख वैद्य, रौफ मुलानी, अशोक मेंगाणे, देवीदास निकम, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. प्रवीण बुल्हे, विजय जेजुरकर, अजित पवार, संतोष निकम यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला मतदारसंघ सतत दुष्काळाच्या छायेत होता. येथील दुष्काळ दूर करण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला. यंदाच्या पावसाळ्यात दोनदा डोंगरगावपर्यंत पाणी आले. शेकडो बंधारे भरले. काही लोकांना मात्र हे पाणी दिसत नाही, असा चिमटा भुजबळ यांनी विरोधकांना काढला.येवला सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. छगन भुजबळ यांनी विविध पाणी योजना मार्गी लावल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला आहे. मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे केली आहेत, असे अंबादास बनकर यांनी सांगितले.

येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाजपचे राजेंद्र परदेशी, मायावती पगारे, संजय पगारे, विनायक भोरकडे, गोरख वैद्य, रौफ मुलानी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, भागीनाथ पगारे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद पदाधिकाऱ्यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

भुजबळांच्या आज तीन सभा

मंत्री छगन भुजबळ यांची गुरुवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता रोकडोबा पार, सायगाव येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मुखेड येथे तर सायं. ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवगाव, ता. निफाड येथे प्रचार सभा होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या