Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : सुनीता चारोस्करांना लळा अन् रामदास चारोस्करांचा जिव्हाळा…!

Nashik Political : सुनीता चारोस्करांना लळा अन् रामदास चारोस्करांचा जिव्हाळा…!

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांची हजारोंच्या उपस्थितीत रेकॉर्डब्रेक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्चा व उभे राहण्यासाठी जागा कमी पडली. परंतू आपल्या कार्कार्त्यांबरोबर स्वतः माजी आमदार रामदास चारोस्कर (Ramdas Charoskar) हे जवळपास तीन तास उभे राहिले. त्याचबरोबर सुनिता चारोस्कर यांना भेटण्यासाठी मतदारसंघातून वयोवृध्द महिला देखील उपस्थित होत्या. सभा संपल्यानंतर सुनिता चारोस्कर यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. त्या गर्दीत देखील प्रत्येकाची विचारपूस करीत महिला, युवक, युवती यांच्याविषयी एक असलेल्या आस्थेचे दर्शन दिले.

- Advertisement -

उपस्थिती आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशिर्वादामुळे सुनिता चारोस्करांच्या डोळ्यातून आनंदाश्रु देखील बघायास मिळाले. या सभेत शरदचंद्र पवारांच्या ‘पॉवर ‘बरोबरच ‘सुनिता चारोस्करांना (Sunita Charoskar) कार्यकर्त्यांविषयी असलेला लळा आणि माजी आमदार रामदास चारोस्कर यांना कार्यकर्त्यांचा असलेल्या जिव्हाळा’ सर्वांनी बघितला. दिंडोरी पेठ मतदारसंघात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निशाणीची क्रेज वाढली असून सुनिता चारोस्कर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कार्यकर्ता उभा, मग मी कसा स्टेजवर जाऊ? चारोस्करांचा साधेपणा कार्यकर्त्यांना भावला

दिंडोरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार (Candidates of Mahavikas Aghadi) सुनीता चारोस्कर यांच्या समर्थनार्थ शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. हजारो कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. अंदाजाच्या पलीकडे कार्यकर्ते आल्याने आयोजकांची धावपळ उडाली. यावेळी मंडपमधील खुर्च्छा कमी पडल्या. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठीसुद्धा जागा कमी पडत होती. यावेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार रामदास चारोस्कर हे उपस्थित होते. महिला व वयोवृद्धांना खुच्र्यांवर बसवून तरुणांनी उभे राहणे पसंत केले. हजारोंच्या संख्येने तरुण उभे होते. माझा कार्यकर्ता उभा असताना मी स्टेजवर जाणार कसा? असा प्रश्न रामदास चारोस्करांना पडला.

यावेळी कार्यकर्त्यांमध्येच उभे राहून सभा ऐकायची तयारी चारोस्करांनी केली. शरदचंद्र पवार यांचे स्टेजवर आगमन होत सभा सुरू होताच सूत्रसंचालन करणाऱ्यांनीही माजी आमदार रामदास चारोस्कर यांना स्टेजवर येण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनीदेखील ‘साहेब, तुम्ही स्टेजवर जा, आम्ही थांबतो’ अशी विनंती केली. परंतु माझ्या कार्यकर्त्याला खुर्ची नाही तो उभा राहून सभा बघेल तेव्हा मी स्टेजवर जाऊन खुर्चीवर कसा बसू? असा प्रतिसवाल करत मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर येथेच उभा राहील, असा पवित्रा चारोस्करांनी घेतला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर जवळपास तीन तास माजी आमदार रामदास चारोस्कर हे उभे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा आणि त्यांच्यातील साधेपणाचे दर्शन सर्वांनाच झाले. याविषयी मतदारसंघामध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलांमध्ये ताईंचीच क्रेझ; वयोवृद्धांचा ‘आशीर्वाद’ आणि युवतींची ‘साथ’

दिंडोरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या समर्थनार्थ शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यात युवती पासून वयोवृद्धांपर्यंत महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. सभा संपेपर्यंत शतितत सर्वांची भाषणे उपस्थितांनी ऐकली. विशेष म्हणजे सभेची सांगता होऊन देखील कार्यकर्ते शांतपणे आपल्या जागी उभे होते. विशेषतः महिला व युवतींनी स्टेजवर जाऊन सुनीता चारोस्कर यांना पाठिंबा देत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. वयोवृद्ध महिलांनीदेखील विजयाचा आशीर्वाद सुनीता चारोस्करांना दिला.

यावेळी मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून महिलावर्ग उपस्थित होऊन देत असलेल्या पाठिंब्याला सुनीता चारोस्कर या भारावून गेल्या. त्यांनी देखील महिला, युवतींची आस्थेने विचारपूस करत एक आपलेपणाचे दर्शन घडवून आणले. वयोवृद्ध महिलांकडून आशीर्वाद घेत ‘मायेची मिठी’ मारताना सुनीता चारोस्कर दिसून आल्या. आपली मुलगी म्हणून सुनीता चारोस्कर यांच्याकडून झालेली विचारपूस आणि त्यांच्या कृतीतून कार्यकर्त्यांविषयी असलेला लळा दिसून आला. युवक वर्गालादेखील जाताना सांभाळून जा, स्वतःची काळजी घेण्याच्या सूचना देखील सुनीता चारोस्कर देत होत्या. ‘लोकप्रतिनिधी कसा असावा’ याचे मूर्त स्वरूप सुनीता चारोस्कर यांच्या कृतीतून दिसून आले. आपला साधेपणा आणि कार्यकर्त्यांविषयी असलेला लळा हेच सुनीता चारोस्कर यांच्या विजयाचे समीकरण असेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या