Tuesday, June 30, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : महापौर हिमगौरी आडके यांची नगरसेवक बडगुजर-शहाणेंना तंबी; म्हणाल्या, "असा...

Nashik News : महापौर हिमगौरी आडके यांची नगरसेवक बडगुजर-शहाणेंना तंबी; म्हणाल्या, “असा प्रकार पुन्हा घडल्यास थेट…”

नाशिक | Nashik

नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२९) रोजी पार पडली. यावेळी नगरसेविका साधना मटाले यांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या सभापतींना देत असताना नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

- Advertisement -

त्यानंतर बडगुजर यांनी देखील शहाणे यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी उपस्थित नगरसेवक मुरलीधर भामरे (Murlidhar Bhamare) यांनी दोघांचीही समजूत घालत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहाणे आणि बडगुजर यांनी सभागृहातील प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) महासभेवेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दोघांनाही चांगलीच तंबी दिली.

दरम्यान, महापौर आडके यांनी आजच्या महासभेत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर व मुकेश शहाणे यांच्यात झालेल्या प्रकाराचा निषेध करत असे प्रकार पुन्हा घडल्यास थेट सहा महिने महासभेतून (Mahasabha) निलंबित करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

एआय आधारित गॉगलच्या वापरावर नियंत्रणासाठी समिती नेमणार – गृह राज्यमंत्री योगेश...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित स्मार्ट गॉगल्स आणि स्मार्ट ग्लासेसच्या वापराबाबत तसेच संवेदनशील ठिकाणी त्यांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात येणार असून...