Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकNashik Political : महाविकास आघाडी एकत्र लढणार का?

Nashik Political : महाविकास आघाडी एकत्र लढणार का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) मध्ये चांगली कामगिरी झाली. मात्र त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे महाविकास आघाडीतील काही नेते व माजी लोकप्रतिनिधी अस्वस्थ दिसत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) मुंबई मनपा स्वचळावर लढण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडी राज्यात एकत्र येऊन मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतील का, अशी चर्चा गत आहे.

- Advertisement -

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aagahdi) स्थापन झाले होते. मात्र नंतर सेनेत फूट पडली व राज्यात सुमारे अडीच वर्षातच सत्ता बदल होऊन महायुतीचे सरकार आले. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे यश मिळाले नाही. तर आता राज्यातील मनपा, जिल्हा परिषदांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयार सुरु केली आहे. एकीकडे महायुती एकसंघ दिसत असली तरी महाविकास आघाडीत पूर्वीप्रमाणे संवाद दिसत नाही. मुंबई मनपा स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना ठाकरे गटाकडून मिळत आहे. त्यामुळे चर्चा रंगत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्यामुळे अनेक जण आघाडीकडे वळले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिल्याने व जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागा महायुतीला मिळाल्याने महाविकास आघाडीला जिल्ह्यात खाते देखील उघडता आले नाही. नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदार भाजपचे अजून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते, तर २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली होती.

यानंतर २०१४ ला विधानसभा निवडणुकीत शहरातील चार पैकी तीन आमदार भाजपचे (BJP) निवडून आले होते तर २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती. त्यानंतर २० २२ मध्ये नाशिक महापालिका निवडणूक होणार होती, मात्र विविध कारणांनी ते अद्याप झालेले नाही. येत्या २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे तर यंदाही नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदार भाजपचे असल्यामुळे भाजपला पुन्हा सत्ता येणार, असा विश्वास आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी या सर्व पार्श्वभूमीवर काय निर्णय घेते व तिन्ही पक्ष एकत्र राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या