Monday, April 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : सटाण्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपत रस्सीखेच; मोरेंच्या पत्नीच्या नावावर शिक्कामोर्तब?

Nashik Politics : सटाण्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपत रस्सीखेच; मोरेंच्या पत्नीच्या नावावर शिक्कामोर्तब?

नाशिक | Nashik

नगरपरिषदेची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर तब्बल पाच वर्षांनतर सटाणा नगरपरिषद निवडणुकीची (Satana Nagarparishad) रणधुमाळी सुरू झाली असून, यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून (Candidate) भारतीय जनता पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यातचजमा असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रंकडून मिळत आहेत. दरम्यान, या घडामोडींमुळे पक्षातील इतर प्रबळ इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातून बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

भाजपकडून (BJP) नगराध्यक्षपदासाठी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे खंदे समर्थक व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीधर कोठावदे यांच्या स्नुषा रूपाली कोठावदे आणि योगिता मोरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. याचबरोबर राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक नितीन सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई सोनवणे तसेच डॉ. विद्या सोनवणे या दोघेही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याने सटाणा भाजपच्या राजकारणात चार वेगवेगळे गट सक्रिय झाले आहेत. बुधवारी (दि.१२) मुंबई येथे माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या माध्यमातून भाजप प्रदेशाध्यक्षांबरोबर कोठावदे यांची समर्थकांसह उमेदवारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचे बोलले जात आहे.

बैठकीनंतर माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्या नावावर तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) यांनी मोरे यांना ठामपणे समर्थन दिले आहे. त्यांच्या शिफारशीला प्रदेश नेतृत्वाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अखेर मोरे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. कोठावदे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उपाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली, त्यांनी प्रभाग आठ मधून उमेदवारी दाखल करावी, असा पर्याय पक्षाकडून देण्यात आला आहे. मात्र या निर्णयाने त्या समाधानी नसून बंडखोरीच्या पकियात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या समवेत नगरसेवक पदाचे काही इच्छुकही उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोरे विरोधकांची टीका

नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कार्यकाळातील अनेक कामे अपूर्ण राहिलेली असून देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या कामात ही भ्रष्टाचार झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळविण्यात मोरे यांचे योगदान असून, त्यामुळेच पक्ष योगिता मोरे यांच्यावर विश्वास दाखवेल, असा दावा मोरे समर्थकांनी केला आहे.

उमेदवारी निश्चितीनंतरच ठरणार दिशा

राजकीय जाणकारांच्या मते मोरे यांची उमेदवारी भाजपसाठी अनुकूल ठरू शकते मात्र कोठावदे व सोनवणे गट यांच्या नाराजीचा सामना पक्षाला करावा लागल्यास आगामी निवडणुकीत अंतर्गत मतभेद मोठे आव्हान ठरू शकते. सध्या सटाणा भाजपमध्ये शांतता दिसून येत असली तरी अंतर्गत तापमान मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंतदेखील उमेदवारीवरून दुखावले जात आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्थानिक राजकारणाची दिशा स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...