Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : डॉ. हेमलता पाटील यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'; कोणत्या पक्षात...

Nashik Politics : डॉ. हेमलता पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; कोणत्या पक्षात जाणार?

नाशिक | Nashik

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून (Congress) शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश करणाऱ्या डॉ.हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर (ट्विट) व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

- Advertisement -
https://twitter.com/DRHEMLATA3/status/1912074157254226247

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) नाशिक मध्य मतदारसंघातून पाटील इच्छुक होत्या. पंरतु, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागावाटपात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे पाटील नाराज झाल्या होत्या. यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते (Vasant Gite) यांचा प्रचार केला होता.

मात्र, त्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ होत्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, त्यांनी आता शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे आता त्या कोणत्या पक्षात जातात, हे बघणे महत्वाचे असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...