Friday, April 24, 2026
HomeनाशिकNashik Politics : माजी नगरसेविका संगीता गायकवाडांचा पतीसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Nashik Politics : माजी नगरसेविका संगीता गायकवाडांचा पतीसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

भारतीय जनता पक्षाचा (BJP) राजीनामा देऊन माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangita Gaikwad) आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी आज (सोमवार) भव्य शक्ती प्रदर्शन करत ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

- Advertisement -

यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी सूर्यवंशी हे देखील हजर होते. याप्रसंगी मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. संगीता गायकवाड प्रभाग क्रमांक २० च्या माजी नगरसेविका असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या (NMC Election) दृष्टीने हा प्रवेश सोहळा महत्वाचा मानला जात आहे. भाजपचे नाशिकरोडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्याविरुद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत गायकवाड हे निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही लढत नाशिकरोड मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

ताज्या बातम्या