Thursday, September 10, 2026
HomeनाशिकNashik Politics : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरेंचा उद्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Nashik Politics : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरेंचा उद्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अपूर्व हिरे (Dr. Apoorva Hiray) यांचा भारतीय जनता पार्टी पक्षात (BJP) प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून बुधवारी (दि.२ जुलै) रोजी मुंबई (Mumbai) येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजता त्यांचा शेकडो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिका-यांसह पक्ष प्रवेश सोहळा निश्चित करण्यात आला आहे.

- Advertisement -

नुकतेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P. Nadda) यांनी थेट दुरध्वनीकरून डॉ. हिरे यांना पक्षात अधिकृत प्रवेशासाठी आमंत्रित केलेले होते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा देखील झाली असून, त्यांनतर पक्षात अधिकृत प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच नाशिक शहरातून (Nashik City) हजारो कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमंत्रण व आपल्या ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या (Local Body Election) पार्श्वभुमीवर शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार हिरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...