Friday, May 1, 2026
Homeमुख्य बातम्याBharat Kokate BJP Join : मंत्री माणिकरावांचे बंधू भारत कोकाटेंचा भाजपात प्रवेश

Bharat Kokate BJP Join : मंत्री माणिकरावांचे बंधू भारत कोकाटेंचा भाजपात प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Kokate) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.भारत कोकाटे यांनी २०२२ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता.त्यानंतर गुरुवारी (दि.१६) त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांच्या या प्रवेशामुळे सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मी लॉन्स बँक्वेट हॉल, पंचवटी, नाशिक येथे हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष सुनील केदार आदी उपस्थित होते. यावेळी कोकाटे म्हणाले की, “मी चार ते पाच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत काम केले. पंरतु, कार्यकर्त्यांना पाहिजे तसा न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे आज भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षश्रेष्ठी जे सांगतील ते काम करण्यास तयार आहे. मी कोणावरही नाराज नाही. भाऊ माणिकराव कोकाटे यांच्याशी राजकीय मतभेद असून, कौटुंबिक नाही. त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले, मीही स्थान निर्माण करू इच्छितो. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून, निवडून आल्यास जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करील, ” असे त्यांनी म्हटले.

भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व सोमठाणे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने भाजपला सिन्नर तालुक्यात मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याची रणनीती आखली आहे. यामध्ये भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग मानला जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १ मे २०२६ – पुरोगामी प्रतिमा जपण्याचे आव्हान

0
महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सहासष्टावा वर्धापनदिन अन्य काही दिनांप्रमाणे केवळ साजरा करण्यात मराठीजनांनी धन्यता मानली तर सध्याच्या स्थितीत ती एक मोठीच आत्मवंचना ठरेल, असे म्हटले तर...