Tuesday, April 28, 2026
HomeराजकीयNashik Politics : मनसे-ठाकरेंची शिवसेना निवडणुकीपूर्वी पेटवणार 'मशाल'; काढणार भव्य जनआक्रोश मोर्चा

Nashik Politics : मनसे-ठाकरेंची शिवसेना निवडणुकीपूर्वी पेटवणार ‘मशाल’; काढणार भव्य जनआक्रोश मोर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हनी ट्रॅपच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेच्या (MNS and Shivsena UBT) वतीने शुक्रवार (दि.१२) रोजी बी.डी. भालेकर मैदान येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनआक्रोश मोर्चा (Jan Aakrosh Morcha) काढण्यात येणार असल्याची अशी माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, ठाकरे सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

शहरात व जिल्ह्यात (District) अनेक दिवसांपासून एमडी ड्रग्स, अमली पदार्थ ,अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे व कोयता गॅंग यांची दहशत यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, कर्जमाफी, हमीभाव, वीजपुरवठा या आश्वासनांची फसवणूक, स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, रस्ते कामांत कोट्यवधींचे घोटाळे; शहराच्या रस्त्यातील खड्डयांकडे दुर्लक्ष, स्मार्ट मीटर आणि खासगीकरणाच्या नावाखाली घराघरात लूट, नागरिकांवर अधिक बिलांचा भार, कुंभमेळ्यासाठी तयारी शून्य, बाहेरच्या कंत्राटदारांना प्राधान्य, स्थानिकांना वंचित ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, कोट्यवधी रूपये खर्चूनही प्रकल्प बंद असून गोदावरीसह नद्यांचे (Godavari River) प्रदूषण वाढले, आयटी पार्क व मोठे प्रकल्प शहरात येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी रतनकुमार इचम, जयंत दिंडे, डी जी सूर्यवंशी, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, प्रथमेश गीते, सुजाता डेरे, नामदेव पाटील, संदीप किरवे, असलम मणियार, बंटी कोरडे उपस्थित होते.

२५ हजार मोर्चेकरी सहभागी होणार

मनसे व ठाकरेंच्या शिवसेनच्या वतीने मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे, बैठका घेण्यात आल्या असून, मोर्चासाठी सुमारे २५ हजार मोर्चेकरी सहभागी होतील असे दोन्ही पक्षांच्यावतीने सांगण्यात आले. दोन्ही पक्ष एकत्र येत प्रथमच मोठा मोर्चा काढण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२६ – ट्रम्प यांची ‘नरक’वारी अन् भारताची...

0
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर स्थायी मित्र किंवा स्थायी शत्रू नसतात, असतात ते फक्त स्थायी हितसंबंध, हे वचन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...