Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती; सुनील बागुल...

Nashik Politics : ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती; सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता ठाकरे गटाने सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करत नवीन महानगरप्रमुखाची नेमणूक केली आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना (U B T) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacakeray) यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे”, असे राऊत म्हणले आहेत.

तसेच नाशिक ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) महानगरप्रमुखपदी माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांचे चिरंजीव व माजी उपमहापौर प्रथमेश गीते (Prathamesh Gite) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देखील संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...