Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला विजयी गुलाल; 'या' नगरपरिषदेत सदस्याची ...

Nashik Politics : शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला विजयी गुलाल; ‘या’ नगरपरिषदेत सदस्याची बिनविरोध निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Nandgaon Nagarparishad) शिवसेना शिंदे गटाने (Shinde Shivsena) पहिला बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ८ ‘ब’ मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा विजयी (Won) होणारा हा पहिला उमेदवार ठरला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या फुटीनंतर खान जुबेदाबी गफार या शिंदे गटाच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत. खान जुबेदाबी गफार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मनोबल वाढले आहे.

दरम्यान, एकीकडे नगराध्यक्षपदासाठी (Town Council President) तिरंगी लढत अपेक्षित असताना, सदस्याच्या जागेवर बिनविरोध विजय मिळवल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने शुभ संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...