Thursday, September 10, 2026
HomeनाशिकNashik Politics : विलास शिंदेंना महानगरप्रमुख पदावरून हटवले; मामा राजवाडे यांच्याकडे जबाबदारी

Nashik Politics : विलास शिंदेंना महानगरप्रमुख पदावरून हटवले; मामा राजवाडे यांच्याकडे जबाबदारी

शिंदे गटात प्रवेश करणार; सातपूरमधील तीन माजी नगरसेवकांचाही समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षामध्ये सातत्याने उलथापालथ होताना दिसून येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ट्विट करून नाशिक महानगरप्रमुख म्हणून मामा राजवाडे (Mama Rajwade) यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. विलास शिंदे हे सातपूर भागातील तीन माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विलास शिंदे (Vilas Shinde) यांचा गेल्या काही महिन्यांपासून नाराजीचा सूर होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुलीच्या लग्नातील हजेरी पक्षात अस्वस्थता निर्माण करणारी होती. सलग दोन लग्नांमध्ये त्यांची भेट झाल्यानंतर विलास शिंदे पक्षांतर करण्याची शक्यता दाटली होती. या पार्श्वभूमीवर विलास शिंदे यांनी गुरुवारी (दि. २६) मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षात असलेल्या नाराजीबद्दल मते जाणून घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दुसऱ्या पक्षात सन्मानाने जाण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, या मिसळ पार्टीला (Misal Party) २४ तास उलटत नाही तोच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी महानगरप्रमुख पदावर मामा राजवाडे यांची थेट नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्याद्वारे विलास शिंदे यांचे पद काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उबाठा पक्षांतर्गत नाराज असणारे व विशेषतः सातपूर विभागातील (Satpur Area) कार्यकर्त्यांची बेचैनी मोठ्या प्रमाणात दिसून आली.

विलास शिंदे यांना वैयक्तिक कारणांमुळे पक्षाला वेळ देता येत नव्हता. महानगरात शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्ते मेळावे घेतले जात होते. त्यातही त्यांची उपस्थिती नव्हती. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखांनी ट्विट करून निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करू.

डी.जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे पक्ष

मागील तीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेचे कार्य केले होते. प्रभागातील चारही नगरसेवक विजयी करण्यासोबतच पक्षाचे सातपूरमध्ये बळ टिकवून ठेवले होते. शिवसेनेच्या एकनिष्ठेचे हे फळ आहे. उबाठा गटात कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास बंदी आहे हे यातून दिसून येते. भावना व्यक्त करणे हा गुन्हा आहे काय?

विलास शिंदे, माजी महानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे पक्ष

ताज्या बातम्या

MPSC Exam : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५...