Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : नाशिकमध्ये लवकरच राजकीय भूकंप! अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर;...

Nashik Politics : नाशिकमध्ये लवकरच राजकीय भूकंप! अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महानगरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, प्रचंड उलथापालथी घडत असल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांना (Candidate) भाजपचे (BJP) आकर्षण वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

- Advertisement -

सत्ता आणि संधींच्या गणितात भाजप सुरक्षित पर्याय भावना असल्याची ठरत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे. याचदरम्यान शहरातील विविध पक्षांचे काही वरिष्ठ नेते २५ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या आहेत. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी विश्वासनीय सूत्रांनुसार या प्रवेशाची तयारी वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता वाढली आहे. नवनवीन इच्छुकांना प्रवेश दिल्यामुळे आपलं काय होईल ? असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. आपण असा सवाल उपस्थित फक्त सतरंज्याच उचलावयाच्या का? करत कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.

वरिष्ठ नेतेच भाजपच्या वाटेवर

विशेष म्हणजे,सध्या आपापल्या पक्षांमध्ये तिकीटवाटपाची जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ नेतेच भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चामुळे संबंधित पक्षांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. जर हे नेते पक्ष सोडून गेले तर उर्वरित कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची आणि पक्षसंघटनांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय तत्त्वांपेक्षा सत्तेची समीकरणे महत्त्वाची ठरत असल्याचे हे चित्र असल्याची टीका होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे पक्षांतर हे लोकशाही प्रक्रियेसाठी कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. एकीकडे भाजप आपली ताकद वाढवत असताना, दुसरीकडे इतर पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. आगामी काही दिवसांत हे पक्षांतर प्रत्यक्षात घडते की केवळ चर्चापुरतेच मर्यादित राहते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे महानगरातील राजकारण निर्णायक वळणावर उभे आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...