Monday, April 6, 2026
HomeराजकीयNashik Politics : काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवेंसह 'यांचा' शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Nashik Politics : काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवेंसह ‘यांचा’ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीच्या (Nashik NMC Election) पार्श्वभूमीवर नाशकात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून, विविध पक्षांचे पदाधिकारी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांत प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी काल (मंगळवारी) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करत पक्षाला सोडचिठ्‍ठी दिली होती. त्यामुळे ते नेमक्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. यानंतर आज (बुधवारी) दिवे यांनी मुंबई गाठत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Congress Politics : माजी नगरसेवकाने सोडला काँग्रेसचा ‘हात’; पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा

दरम्यान,दिवे (Rahul Dive) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना लिहिलेल्या पत्रात “मी राहुल अशोक दिवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव या नात्याने काँग्रेस पक्षा मध्ये कार्यरत आहे. गेल्या काही काळापासून मला या पदाच्या माध्यमातून पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपला/पक्षाचा आभारी आहे. परंतु, माझ्या काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे, मला यापुढे पक्षाचे काम सुरू ठेवणे शक्य नाहीये. तरी, मी माझ्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारण्यात यावा, ही विनंती”. असे म्हटले होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...