Saturday, May 30, 2026
HomeनगरSangamner : नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी बोटा येथे रास्ता रोको

Sangamner : नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी बोटा येथे रास्ता रोको

पालकमंत्री विखे पाटलांच्या आश्वासनानंतर स्थगित

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections) झाल्यानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या (Nashik Pune Railway) प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर बोटा येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रश्नासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बोटा येथे सोमवारी (दि.12) संगमनेर-अकोले तालुक्यातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.आंदोलकांच्या मागण्या प्रांताधिकारी अरुण उंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कळवल्या होत्या. पारनेर तालुक्याच्या दौर्‍यावर असलेले जलसंपदा तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला. आमदार डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले व नीलम खताळ यांच्यासह सर्वांनाच आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.

महापालिकेची निवडणूक प्रक्रिया येत्या काही दिवसांत संपणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मिळू शकेल. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केल्याने या प्रश्नावर भूमिका मांडता येईल असे सांगून मंत्री विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी आंदोलकांच्या भूमिकेबरोबरोबच आपण असल्याची ग्वाही दिली. आमदार लहामटे व डॉ. नवले यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलनातील भूमिका सांगितली.सर्वांच्या भावना समजूत घेत मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...