Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकनाशिक-पुणे रेल्वे आराखडा अंतिम टप्प्यात; खा. वाजेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

नाशिक-पुणे रेल्वे आराखडा अंतिम टप्प्यात; खा. वाजेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प (Nashik to Pune Semi High Speed ​​Project) आता लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत खा. राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी चौथ्यांदा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची भेट घेतली. दरम्यान, शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणिखा, राजाभाऊ चाजे यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खा. वाजे यांना दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला मागील काही वर्षांत अनेक अडचणी आल्या आणि प्रकल्प रखडला आहे. याबाबत खासदारपदी निवडून येताच राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्यात रेल्वे शिडीमार्गे होणार की संगमनेरमार्गे होणार, असा प्रश्न होता. मात्र खा. वाजे यांनी सातत्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मागनि होईल, असे निश्चित करण्यात आले. दरम्यान, महारेलच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आराखड्यात (डीपीआर) नारायणगाव (Narayangaon) येथील जीएमआरटी आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सद्वारे चालवली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बिणी) या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच त्याचाबत आता नव्याने आराखडा (डीपीआर) बनवण्याच्या कामाला खासदार राजभाऊ वाजे आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीनंतर मान्यता देण्यात आली.

हे देखील वाचा : Nashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर होणार परिणाम

नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्पाला (GMRT Project) वळसा घालून नव्याने रेल्वेमार्गाचा डीपीआर बनवला जात आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत नवा डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खा. वाजे यांना दिली.महारेलने बनवलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील जीएमआरटीमधून रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र नव्याने तयार होत असलेल्या डीपीआरमध्ये जीएमआरटीला बळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान ६० ते ९० कि. मी. अंतर वाढून अर्ध्या तासाचा वेळ वाढणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खा. राजभाऊ वाजे यांच्च्या बैठकीत मंत्री म्हणाले की, या पंचवार्षिक काळात देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे, त्यामुळे हा प्रकल्पदेखील लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. दरम्यान, खा.वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुरवठ्यामुळे तेदेखील या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत.

हे देखील वाचा : मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी कैणव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. आता नव्याने बनवला जात असलेला डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी मिळावी, असा प्रयत्न करत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील विनंती करणार आहे.

खा. राजाभाऊ वाजे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...