Saturday, September 12, 2026
HomeनाशिकSurgana Rain News : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा...

Surgana Rain News : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यात बुधवारी (दि. २२ जुलै) रोजी दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर रात्री सात वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, जनजीवन पूणर्पणे विस्कळीत झाले आहे. तर पावसामुळे भोरमाळ येथील शेतकऱ्याचा (Farmer) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

भोरमाळ येथील शेतकऱ्याचा मृत्यू

तालुक्यातील भोरमाळ (Bhormal) येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम चव्हाण (वय ४२, रा. भोरमाळ, ता. सुरगाणा) हे आपल्या शेतात जात असताना नाल्यातील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ केली जात आहे.

नद्यांना महापूर, धोक्याची पातळी ओलांडली

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नार, पार, अंबिका, तान, मान, वाझडी, गिरणा, भिवतास आणि कावेरी या सर्व प्रमुख नद्यांना महापूर आला असून या नद्या (River) धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. नद्यांसोबतच परिसरातील छोटे-मोठे नालेही दुथडी भरून वाहत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

२५-३० वर्षे जुन्या मोऱ्यांमुळे संपर्क खंडित

पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील पिंपळसोंड, रघतविहीर, फणसपाडा आणि अंबोडे या चार गावांचा सुरगाणा तालुक्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या पाईपच्या मोऱ्या आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी या मोऱ्यांवरून वाहत असल्याने या भागातील गावांचा संपर्क तुटणे ही नेहमीचीच समस्या बनली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

वीजपुरवठा खंडित, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अतिदुर्गम भागात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे. कामानिमित्त किंवा अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सखल भागात पाणी साचल्याने दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तालुक्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, अतिप्रसंगी किंवा कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि पुराच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पावसाची संततधार सुरूच होती.

ताज्या बातम्या

Kopargaon : समृद्धी महामार्गावरील चाकूच्या धाकाचा दरोडा उघडकीस

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon समृद्धी महामार्गावर आयशर वाहन दुरुस्त करणार्‍या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा...