नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात (District) पुढील पाच दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. बुधवार दि.२४ आणि दि.२६ सप्टेंबरला येलो अलर्ट कायम राहून हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी), मुंबईने (Mumbai) दिली आहे.
या कालावधीत कमाल तापमान २७-२८ अंश सेल्सीअस आणि किमान तापमान २१-२२ अंश सेल्सीअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ९-१२ किमी/तास असेल. आज, २३ सप्टेंबरला नाशिक व घाट क्षेत्रात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Heavy Rain) विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी/तास) येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी (Farmer) पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा आणि कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे. विजेच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी (Igatpuri) यांनी दिला आहे.




