Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदै.‘देशदूत'आयोजित 'पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो'ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दै.‘देशदूत’आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांनी प्रदर्शन स्थळावर गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे जत्रा चौफुली, नांदूर-लिंक रोडवरील रामलिला बँक्वेट हॉल येथील वातावरण उत्साही बनले होते. ‘स्वप्न तुमचे, शोध आमचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या प्रदर्शनात नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपले एकापेक्षा एक सरस प्रकल्प सादर केले असल्याने ग्राहकांना एकाच छताखाली घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. बजेट होम्स शोधणाऱ्या मध्यमवर्गीयांपासून ते लक्झरी विला आणि कमर्शियल शॉप्स खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकाच्या पसंतीस पडेल असे गृहप्रकल्प येथे मांडण्यात आले आहेत.

प्रदर्शनाचा शनिवारचा (दि.३०) दुसरा दिवस अत्यंत यशस्वी ठरला. पर्यावरणपूरक संकल्पनेला प्रोत्साहन देणारे ‘पापायज नर्सरी’ हे या प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर असून, त्यांच्या संकल्पनेचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे. उद्या (दि. ३१) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे. दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, तरी घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक नाशिककराने या संधीचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागी बांधकाम व्यावसायिक
पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप, दक्ष रियल्टी, स्कीया प्रॉपर्टीज, सीडीआयएल, ललवाणी ग्रुप, जय डेव्हलपर्स, एलिका ग्रुप, आरसीपीएल, शेठ रियल्टी, सुमित बिल्डकॉन, सचिन पी. बागड, एस अँड एस डेव्हलपर्स, ट्रिनिटी रियल्टर्स, ए. आर. डेव्हलपर्स, नंदन, ओंकारंश्वर इन्फ्राटेक, अर्थलँड डेव्हलपर्स आणि विजा प्रॉपर्टीज्

ताज्या बातम्या

Nashik News : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेच्या नोंदणीला मुदतवाढ; ‘या’...

0
नाशिक | Nashik आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७चा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत (Citizen) पोहोचविण्यासोबतच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांचा (Ganesh Mandal) व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा...