Friday, May 8, 2026
HomeनाशिकNashik News: बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण; मारहाणीनंतर सिटी लिंक बस चालकांचा...

Nashik News: बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण; मारहाणीनंतर सिटी लिंक बस चालकांचा बंद, प्रवाशांचे हाल

नाशिक रोड | प्रतिनिधी
नाशिक रोड बस स्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी सिटी लिंक बस ड्रायव्हरला रिक्षा चालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सिटी लिंक बस चालकांनी अचानक बस बंद आंदोलन पुकारले आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर सिटी लिंक बस ड्रायव्हर यांनी बस बंद केल्यामुळे सकाळच्या वेळेस प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहे.

नेमकी घटना काय?
नाशिक रोड मार्गावरुन जाणाऱ्या सिटी लिंकच्या बस चालकांनी हा बंद पुकारला आहे. सिटी लिंकची बस स्थानकातून बाहेर काढताना रिक्षाचालकांनी बस चालकाला दमदाटी करत वाद घातला आणि त्यानंतर रिक्षा चालकांच्या टोळक्याने बस चालक लक्ष्मण नायकर यांना मारहाण केली. या घटनेनंतर सिटी लिंक बस चालकांनी बसेस आहे त्या ठिकाणी रस्त्यात सोडून बंद पुकारला. गेल्या दीड तासापासून सिटी लिंक बस चालकांनी बंद पुकारल्यामुळे परिसरातील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. जो पर्यंत संबंधित रिक्षा चालकावर कारवाई होत नाही तो पर्यंत बस धावणार नसल्याची भूमिका बस चालकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे नाशिक रोड स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. या घटनेनंतर नाशिक रोडला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या काही बसेस शहर पोलिसांनी काही प्रमाणात हलवल्या आहे.

- Advertisement -

Nashik News: मोठी बातमी! टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानला अटक

दरम्यान, या घटनेनंतर सिटी लिंकचे अधिकारी, बस चालक, युनियनचे पदाधिकारी हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ताज्या बातम्या

निदा

Sanjay Shirsat: निदा खान छ. संभाजीनगरमध्येच कशी लपली? इम्तियाज जलील यांची...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarटीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न, धार्मिक...