Wednesday, November 25, 2026
HomeनाशिकChhagan Bhujbal : नाशिक तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर...

Chhagan Bhujbal : नाशिक तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा; मंत्री भुजबळांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

नाशिक | Nashik

नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) शेतकरी आणि नागरिकांना निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिक तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे (Rain) असमान वितरण, पावसातील खंड आणि अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहत आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा आणि शेतीच्या पाण्याची उपलब्धता याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे आणि नाशिक तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली होती.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “…तर शरद पवार केंद्र सरकारला मदत करू शकतात”; मंत्री भुजबळांचे ‘त्या’ चर्चेवरून सुतोवाच

नागरिकांच्या या मागणीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तालुक्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, शेतीचे संभाव्य नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करून आवश्यक त्या निकषांनुसार प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्री भुजबळ यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करून नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक; तीन विद्यार्थ्यांचा...

0
पुणे | प्रतिनिधी Pune पुण्यातील बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या आयशर टेम्पोने बसची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यालाच चिरडले. आधी कारला जोरदार...