Tuesday, April 7, 2026
HomeनाशिकNashik News: साधुग्राम परिसरातील प्रस्तावित झाडे तोडण्याला विरोध; सयाजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Nashik News: साधुग्राम परिसरातील प्रस्तावित झाडे तोडण्याला विरोध; सयाजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक मनपाकडून साधुग्राम परिसरातील १,८२५ झाडांची प्रस्तावित तोड विरोधात आता नव्याने आंदोलनाची तयारी होत आहे. यासाठी सेलिब्रेटी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र आले आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक कामासाठी ओळखले जाणारे वरुण सुखराज तसेच मुंबईतील पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. सिंहस्थ मेळ्याच्या तयारीच्या नावाखाली होणारी वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरेल, अशी भूमिका नागरिकांनी मनपाच्या जनसुनावणीत स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी झाडे ही जीवनदायी असल्याने त्यांची तोड कोणत्याही परिस्थितीत नको, असा सूर पर्यावरणप्रेमींनी लावला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निर्णाया विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शेकडो नागरिक त्यात सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम उभी करण्यात येणार आहे. सेलिब्रेटी, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक संघटना यांच्या संयुक्त माध्यमातून व्यापक आंदोलन आकार घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील दोन दिवसांत सेलिब्रेटीज प्रत्यक्ष स्थानिक पाहणी करून पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार असल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते राजू देसले यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...