Monday, July 27, 2026
Homeक्राईमNida Khan: किराणा, चिकन, रोजचा खर्च कोण करत होतं? निदाच्या ४३ दिवसांचा...

Nida Khan: किराणा, चिकन, रोजचा खर्च कोण करत होतं? निदाच्या ४३ दिवसांचा लक्झरी वनवासाचा पर्दाफाश

नाशिक | प्रतिनिधी
एकीकडे नाशिकच्या भद्रकालीतील घास बाजारात जळाऊ लाकडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित्त विवाहिता निदा खानच्या अटकेनंतर समोर आलेली ही माहिती थक्क करणारी आहे.

४३ दिवस पसार असतानाही निदाला एका नगरसेवकामुळे जो ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ मिळाला, तो व्हीआयपी कैद्याला मिळणाऱ्या सुविधेपेक्षा कमी नव्हता. देशातील दिग्गज आयटी कंपनी टीसीएसला हादरवून सोडणाऱ्या लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेने अनेक गौप्यस्फोट झाले आहेत.

- Advertisement -

२६ मार्चला भिवंडीतून बेपत्ता झालेली निदा खान एक-दोन दिवस नव्हे, तर सव्वा महिना छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातील स्लम भागात लपून होती, विशेष म्हणजे, हे घर एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचे होते. निदा एकटी नसून तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशी असे पाच जण तिथे वास्तव्यास होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून ‘बाहेरून’ रसद पुरवण्यासाठी नगरसेवक पटेलने स्वतःचा कार ड्रायव्हर तैनात केला होता. हा ड्रायव्हरच या कुटुंबाला किराणा, चिकन आदी अत्यावश्यक साहित्य पोहोचवत होता.

PM Modi : पेट्रोल-डिझेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा… पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागे कारण काय?

नाशिक पोलिसांची ‘ओळख’ बदलून एन्ट्री
निदाला पकडण्यासाठी एसआयटीचे प्रमुख व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आखलेली रणनीती सस्पेन्स थ्रिलरला साजेशी होती. ‘एमएच १५’ या नाशिक पासिंगच्या गाड्या पाहून निदा सावध होईल, हे ओळखून पोलिसांनी औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांच्या पासिंगची वाहने वापरली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या टीमने सलग तीन दिवस मुस्लीमबहुल नारेगाव परिसरात साध्या वेशात वास्तव्य केले. स्थानिक गुन्हेगारांना किंवा नगरसेवकाच्या खबऱ्यांच्या मनात शंकाही येणार नाही, अशा पद्धतीने जाळे विणले

‘रसद’ पुरवणारे रडारवर !
गुन्हेगाराला आश्रय देणे हा कायद्याने गुन्हा आहे. निदा खानला ४३ दिवस कुणी, कुठे आणि का वाचवले? तिला दररोजचा खर्च कुणी पुरवला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मतीन पटेल आणि त्याच्या ड्रायव्हरला व इतरांना द्यावी लागणार आहेत. एसायटीने आता या सर्वांची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...