त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी (Trimbakeshwar Darshan) असलेल्या सशुल्क दर्शन, ब्रेकअप दर्शन सुविधेतून दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. २५०० रुपये प्रति भाविक दर्शन तिकीटातून ट्रस्टला काही दिवसातच लाखोंचे उत्पन मिळाले आहे. सशुल्क दर्शनामुळे जे भाविक मोफत दर्शन रांगेत उभे राहतात त्यांना मात्र या दोन प्रकारच्या सशुल्क दर्शनामुळे रांगत तासन्तास उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भाविकांनी गैरसोय होऊन अनेक वेळ त्यांना मुख्य गाभाऱ्यात दर्शनास मोठा विलंब होत आहे. यावरून मंदिर परिसरात भाविकांमध्येच वाद होत असल्याचे चित्र आहे.
मध्यंतरी ऑनलाईन तिकीट दर्शनाच्या तीन ठिकाणी खिडक्या उघडण्यात आल्या होत्या. दोनशे रुपये मानसी ऑनलाईन तिकीट याचा मोठा प्रसार झाला. भाविक प्रथम त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यानंतर मंदिराकडे येतो महाद्वारावर मंदिराचा बाह्य परिसर येथे पेड दर्शन रांग मानसी दोनशे रुपये देणगी दर्शन तिकीट घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते. याचा मोठा प्रसार या भाविकांमध्ये अधिक झाल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आणि वाहन तळाकडून संत नगरीकडून येणारे भाविक ९०टक्के असतात त्यामुळे पेड दर्शन च्या रांगा मंदिराच्या बाहेर असतात.
त्यामुळे रांग बघून ते देखील तिकीट काढण्यास प्रवृत्त होतात अशा प्रकारे दोनशे रुपये देणगी दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.पूर्व दरवाजा रांग अशी सहसासहजी दिसत नाही त्यामुळे या जागृत भाविका असतात ते मोफत दर्शन रांग कोठे आहे चौकशी करून रांगेत जा-तात. तिकीटांचा काळाबाजार थांबवण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानकडून मे अडीच हजार रुपये मानसी अर्जंट दर्शन ब्रेक दर्शन योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे लांबून येणारे व अत्यल्प वेळ असणारे भाविक रुपये अडीच हजार २५०० असे तिकीट काढून दर्शन घेतात.
एकाच दिवसात मिळाले २१ लाखांचे उत्पन्न
प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी आणि दर्शनातील काळाबाजार रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या ‘अतितातडीच्या विराम दर्शन’ योजनेला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. देवस्थानने नेहमीच्या दर्शन रांगेला अवघ्या ५ मिनिटांचा ब्रेक देऊन ही विशेष सेवा सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे केवळ काळाबाजार करणाऱ्यांवर चाप बसण्यास मदत झाली. तर, देवस्थानच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. रविवारी एकाच दिवसात या योजनेतून संस्थानला तब्बल २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
…अशी आहे ही ‘५ मिनिटांची’ व्यवस्था
सध्या मंदिरात मोफत ‘धर्मदर्शन’ आणि २०० रुपये देणगी दर्शन या दोन मुख्य सेवा सुरू आहेत. या मुख्य सेवा सुरू असताना, मधल्या काळात फक्त पाच मिनिटांचा विराम दिला जातो. अतितातडीची सेवा घेणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी सोडले जाते.




