Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Trimbakeshwar News : सुट्ट्या अन् विकेंडमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी; पोलिसांचा चोख...

Nashik Trimbakeshwar News : सुट्ट्या अन् विकेंडमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी; पोलिसांचा चोख बंदोबस्त, BDDS पथकाकडूनही तपासणी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारच्या विकेंडमुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) नगरीत राज्यभरातून व परराज्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नुकतीच मंदिर परिसरात (Temple Area) हाणामारीची घटना घडल्याने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली होती. या सर्व पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.

- Advertisement -

५० अंमलदार, ४ अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात

नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष सुरक्षा व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच मंदिराजवळ पोलीस यंत्रणा तैनात झाली असून, आरसीपी (RCP) पथकासह एकूण ५० पोलीस अंमलदार आणि ४ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणी विशेष करडी नजर

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) मंदिर परिसर व महत्त्वाच्या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ, प्रमुख चौक, वाहनतळ, बसस्थानक आणि गर्दीच्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. गर्दीचे योग्य नियोजन करणे, वाहतूक (Trafic) सुरळीत ठेवणे आणि चोरी व पाकीटमारीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

भाविकांना पोलिसांचे आवाहन

दर्शनासाठी (Darshan) येणाऱ्या भाविकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच, गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तू व साहित्याची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून (Police) करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत फोटोंवर अघोरी पुजाविधीचा प्रकार

0
जायखेडा | वार्ताहर Jaykheda बागलाण तालुयातील खमताणे येथील स्मशानभुमीत अंधश्रध्देतून अघोरी पुजेचा धक्कादायक आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. पाच महिला व दोन पुरूषांचे...