Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : पहिल्या दिवशी पाटी कोरीच; आमदाराच्या भावाने...

Nashik Vidhan Parishad Election : पहिल्या दिवशी पाटी कोरीच; आमदाराच्या भावाने नेला उमेदवारी अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय वर्तुळात शांतता पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस ’निरंक’ ठरला. मात्र, पहिल्याच दिवशी पाच उमेदवारांनी एकूण आठ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करणारे हे पाचही उमेदवार (Candidate) कुठल्याही मुख्य राजकीय पक्षाचे नसून, त्यांनी अपक्ष म्हणून हे अर्ज घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Aayush Prasad) यांनी दिली.

अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये सचिन सस्कर (सर्वाधिक ४ अर्ज खरेदी),नाफेडचे संचालक तथा आमदार राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर, फिरोज गफार शेख, प्रतीक खराटे, अजित पवार यांचा समावेश आहे. तर पहिल्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अद्याप अर्ज खरेदी केलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीची (Election) चुरस कशी वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...