Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Yeola News : रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आजी-माजी आमदारांसह ५७ पदाधिकार्‍यांविरूद्ध...

Nashik Yeola News : रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आजी-माजी आमदारांसह ५७ पदाधिकार्‍यांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरात शुक्रवारी (दि.२५) विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको (Rasta Roko) आंदोलनातील सहभागी ५७ विविध राजकीय पक्ष, संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अज्ञात आठ ते दहा जणांविरूद्ध शहर पोलिसात (City Police) फौजदारी गुन्हा (Criminal Case) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, भा.ना.सु.सं.क. ३५ (३) प्रमाणे आंदोलनकर्त्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शहर पोलिसांच्या वतीने याबाबत सूचना पत्र देण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिताकलम १२६(२), २९२ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह उल्लंघन १३५ प्रमाणे (दि. २५) जुलै रोजी आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला असल्याचे सदर पत्रात म्हटले आहे.

तसेच सदर गुन्ह्याचा (Case) तपास सुरू असून, तपासकामी आपली उपस्थिती आवश्यक असल्याने येवला शहर पोलीस ठाणे (Yeola Police Station) येथे बोलवण्यात येईल त्यावेळी आपण समक्ष हजर राहावे. आपणाविरुध्द न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय येवला यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना (शिंदे पक्ष) किशोर सोनवणे, शहरप्रमुख अतुल घटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) शहराध्यक्ष योगेश सोनवणे, डॉ. संकेत शिंदे, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय कासार, भाजपा शहराध्यक्ष मीननाथ पवार, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राहुल लोणारी, प्रमोद सस्कर, माजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, स्वाभिमानी रिपाइं जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे आदी ५७ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अज्ञात आठ ते दहा महिला, पुरुषांविरूद्ध दीपक मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा आजचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 4145 गोण्यांची...