Thursday, April 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये थंडीची लाट कायम; पाच वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद

नाशिकमध्ये थंडीची लाट कायम; पाच वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट जाणवत असून कमाल व किमान तापमानात घट झाली तापमान सरासरीच्या खाली नोंदवले जात आहे. यामध्ये नाशिक- ७.८ (-४.५), जळगाव ६.९ (-४.९), जेऊर ५ (-५.६), यवतमाळ ८.०(-५.९) अंश सेल्सीअस याप्रमाणे सरासरीच्या खाली तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरात या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील ८ दिवस म्हणजेच १९ डिसेंबर (मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्या) महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवार दि.१५ ते गुरुवार दि. १७ दरम्यानच्या तीन दिवसात केवळ काहीशी थंडी कमी होऊ शकते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. नाशिकमध्ये किमान तापमान झपाट्याने घसरत असून नवनवीन निचांकी तापमानाची नोंद होत आहे. नाशिक शहारामध्ये 2020 मध्ये 17 डिसेंबरला ८ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली होती. आता तर त्याहून खाली म्हणजेच ७.८ तापमान नोंदले गेले आहे.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Land Scam : बड्या धेंडांना क्लीन चिट नाहीच! अनेकांनी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील म्हाडा, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डोळ्यांत धूळ फेकून वा त्यांच्या संमतीने कोट्यवधींचा महाघोटाळा करणाऱ्या पांढरपेशा संशयितांसह काही राजकारण्यांचे...