Tuesday, June 16, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi : भारत विकासाचा भागीदार; मलेशियात पंतप्रधान मोदींनी मांडले व्हिजन

PM Narendra Modi : भारत विकासाचा भागीदार; मलेशियात पंतप्रधान मोदींनी मांडले व्हिजन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत (India) हा केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, जागतिक विकासासाठी एक विश्वसनीय भागीदार आहे. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हा त्याचा फायदा केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला होतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशिया दौऱ्यावर (Malaysia Tour) असून, त्यांनी भारताच्या वाढत्या आर्थिक शक्तीचा आणि जागतिक व्यापार करारांचा दाखला देत भारताची भूमिका मांडली. विविध देशांसोबत झालेल्या यशस्वी व्यापार करारांचा संदर्भ देत मोदींनी सांगितले की, जग आता भारताकडे एक स्थिर आणि प्रगत अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे. भारताच्या धोरणांमुळे आणि ऑक दूइंग बिझनेसमुळे गुंतवणूकदारांसाठी भारत ही पहिली पसंती ठरत आहे. दक्षिण-पूर्व आशियातील संबंध अधिक दृडकाचे हा या दौन्याचा मुख्य उद्देश असून, मलेशियासोबत तंत्रज्ञान, व्यापार आणि ऊर्जा सेत्रात नवल्याचे संकेत त्यांनी दिले.

मोदी म्हणाले की, ती मलेशियाचे प्रेम आज दिसून आले आहे. ब्लेशियामध्ये भारतीय संगीत आणि सिनेमा अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मलेशियातील ५००लांमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक पाहत आले आहेत. पंतप्रधान (PM) यांनी नमूद केले की, आज आपण प्रगतीच्या वाटेवर एकमेकांच्या सोबत आहोत. भारत आणि मलेशियाला एक सामायिक कारसा लाभला आहे. मलेशियामध्ये स्वामी विवेकानंद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मी माझ्या मन की बात कार्यक्रमातही मलेशियाचा उल्लेख केला होता, असेही त्यांनी सांगितले.

युपीआयचा मलेशियात प्रवेश

भारताची डिजिटल क्रांती आता मलेशियातही पोहोचणार आहे. लवकरच मलेशियामध्ये भारताची युपीआय प्रणाली सुरू होणार असल्याची घोषणा मोदींनी केली. भारतीय वंशाच्या मलेशियन नागरिकांसाठी मोदींनी मोठी घोषणा केली. आता सहाव्या पिढीपर्यंतच्या मलेशियन नागरिकांना ओसीआय कार्डसाठी पात्र मानले जाईल. तसेच मलेशियात लवकरच भारताचे नवीन वाणिज्य दूतावास उघडले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...